|Sunday, October 21, 2018
You are here: Home » मनोरंजन » या गाण्याद्वारे अवधूतने पाळले प्रसनजीतला दिलेले वचन

या गाण्याद्वारे अवधूतने पाळले प्रसनजीतला दिलेले वचन 

‘सूर नवा ध्यास नवा’ या रिऍलिटी शोमधून नावारूपास आलेला प्रसनजीत कोसंबी लवकरच ‘वाघेऱया’ या आगामी सिनेमाद्वारे पार्श्वगायकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. रिऍलिटी शोच्या मंचावरील प्रसनजीतच्या बहारदार गाण्यावर खूश होऊन परीक्षक अवधूत गुप्तेने माझ्या पुढील चित्रपटात तू पार्श्वगायक म्हणून झळकशील! असे वचन त्याला दिले होते. हेच वचन पूर्ण करत अवधूतने येत्या 18 मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या वाघेऱया सिनेमाचे प्रमोशनल साँग प्रसनजीतकडून गाऊन घेतले. आजीवासन स्टुडियोमध्ये नुकतेच हे गाणे प्रसनजीतच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले.

समीर आशा पाटील दिग्दर्शित आणि लिखित ‘वाघेऱया’ सिनेमाचे हे प्रमोशनल साँग खुद्द दिग्दर्शकानेच लिहिले असून या गाण्याला अवधूत गुप्तेने संगीत दिले आहे. ग्रामीण विनोदावर आधारित असलेल्या या सिनेमासाठी प्रमोशनल गाणं करण्याची संधी जेव्हा अवधूतला मिळाली तेव्हा त्याला प्रसनजीतला दिलेलं वचन आठवलं. तेव्हा त्याने प्रस्तुतकर्ते सुप्रीम मोशन पिक्चर्सचे राजेंद्र शिंदे यांना हे गाणं प्रसनजीतकडूनच गाऊन घेण्याची आग्रहाची विनंती केली. त्याच्या या विनंतीचा मान राखत चित्रपटाच्या संपूर्ण टीमने या वचनपूर्तीमध्ये आपला सहभाग दर्शविला. गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रॉडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या या धम्माल विनोदीपटात किशोर कदम, भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम हे मातब्बर कलाकार झळकणार आहेत.

 

 

Related posts: