|Sunday, August 25, 2019
You are here: Home » मनोरंजन » डेडपूलची भन्नाट फौज

डेडपूलची भन्नाट फौज 

डेडपूलची कमाल आणि धम्माल पुन्हा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. लहान म्युटंट असलेल्या रसेलचे अपहरण झालेले आहे. केबल नावाचा खलनायकी प्रवृत्ती असलेला एक सैनिक रसेलचे अपहरण करतो. रसेलला केबलच्या तावडीतून सुखरुपपणे वाचविण्यासाठी डेडपूल एक्स फोर्स नावाची म्युटंट्सची फौज निर्माण करतो. त्याची गोष्ट डेडपूल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. डेव्हिड लिच यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रायन रेनॉल्ड याने डेडपूलची भूमिका साकारली आहे. जोश ब्रोलिन, मोरिना बॅकरिन, ज्युलियन डॅनिसन यांच्याही भूमिका आहेत.