|Monday, April 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीनच्या विमानवाहू युद्धनौकेच्या चाचणीस प्रारंभ

चीनच्या विमानवाहू युद्धनौकेच्या चाचणीस प्रारंभ 

स्वदेशनिर्मित युद्धनौका  शस्त्रास्त्रांच्या तैनातीनंतर पहिल्यांदाच चाचणी, नौदलाचे सामर्थ्य वाढणार

 वृत्तसंस्था/ बीजिंग

चीनने रविवारी देशात निर्माण केलेल्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेची सागरी चाचणी सुरू केली. चीनने या नौकेचे मागील वर्षी एप्रिल महिन्यात सादरीकरण केले होते. यंत्रणा अत्याधुनिक करणे आणि शस्त्रास्त्रांच्या तैनातीमुळे आतापर्यंत ती सेवेत रूजू झालेली नाही. युद्धनौकेला अद्याप कोणतेही नाव देण्यात आलेले नाही. ही युद्धनौका नौदलात सामील झाल्यावर चीनच्या सागरी सामर्थ्यात वाढ होईल असे मानले जातेय.

देशाची दुसरी विमानवाहू युद्धनौका डालियान शिपयार्ड डॉकवरून स्वतःच्या पहिल्या सागरी चाचणीवर निघाली आहे. या चाचणीचा उद्देश युद्धनौकेची विश्वासार्हता आणि स्थिरतेचे निरीक्षण करणे असल्याचे सांगण्यात आले.

चीनजवळ दोन विमानवाहू युद्धनौका

चीनच्या ताफ्यात आणखी एक विमानवाहू युद्धनौका ‘लायोनिंग’ देखील आहे. रशियात निर्मिलेली ही युद्धनौका 2012 मध्ये चीनला मिळाली होती, परंतु त्याला प्रशिक्षण आणि संशोधनासाठी तयार करण्यात आलेली युद्धनौका मानले जाते. चीनने 2013 मध्येच स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेची निर्मिती सुरू केली होती. नवी युद्धनौका 2020 पासून नौदलात रुजू होईल.

चीनचा गुप्त कार्यक्रम

चीनच्या युद्धनौकेबद्दल आतापर्यंत खूपच कमी माहिती समोर आली आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनंिपग स्वतः या प्रकल्पावर नजर ठेवून आहेत. चीन दीर्घकाळापासून दक्षिण चीन समुद्रावरील प्रभुत्वासाठी अशाप्रकारचे प्रयोग करत आहे.

अमेरिकेच्या तुलनेत जुने तंत्रज्ञान

नव्या युद्धनौकेमुळे चीनच्या सामर्थ्यात भर पडणार आहे, परंतु चीनचे तंत्रज्ञान अमेरिकेच्या नौदलाच्या तुलनेत खूपच मागे  आहे. अमेरिकेकडे  आण्विक क्षमतेने कार्यान्वित होणाऱया 11 विमानवाहू युद्धनौका आहेत, ज्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत विकसित आहेत. तर चीनच्या युद्धनौका अद्याप पारंपरिक इंधनावर निर्भर आहेत.

Related posts: