|Friday, March 22, 2019
You are here: Home » Top News » मंत्रिमंडळात येण्याची ईच्छा नाही : एकनाथ खडसे

मंत्रिमंडळात येण्याची ईच्छा नाही : एकनाथ खडसे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परतण्याची इच्छा नाही ,अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणातील घोटाळय़ाच्या आरोपावरुन दोन वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र या महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांना एसीबीने दिलासा दिला होता. एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी पीटीआयशी संवाद साधला.

“माझी मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही. मात्र मी भाजपही सोडणार नाही’’, असं एकनाथ खडसे म्हणाले. पुढील वषी विधानसभा निवडणुका लागतील. त्यामुळे आता मंत्री होऊन करणार काय, असा सवालही खडसेंनी विचारला. वर्षभरात कुठे ना कुठे निवडणुका होत आहेतच. त्यामुळे आचारसंहिता लागणार.जरी मंत्री झालो तरी कामे करायलाच मिळणार नाही. त्यापेक्षा मंत्रिमंडळात न गेलेलंच बरं, असं खडसे म्हणाले.

 

 

 

 

Related posts: