|Friday, January 18, 2019
You are here: Home » leadingnews » किसान सभा पुन्हा आंदोलन करण्याच्या पवित्र्यात

किसान सभा पुन्हा आंदोलन करण्याच्या पवित्र्यात 

ऑनलाईन टीम / नाशिक :

नाशिक ते मुंबई शेतकऱयांनी काढलेल्या मोर्चाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. पण अद्यापही किसान मोर्चाच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. अधिकाऱयांनी अजून या मागण्या संदर्भात दखल घेतली नसल्याने पुन्हा एकदा किसान सभा आक्रमक होतांना दिसत आहे.

वन हक्क दावे निकाली काढा, वन पट्टय़ांची मोजणी करा यांसह अनेक मागण्या घेऊन किसान सभेचा मोर्चा मुंबईत धडकला होता. त्या घटनेला आज बरोबर दोन महिने पूर्ण झाले आहेत. प्रलंबित दावे तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन देऊन 13 मार्च रोजी सरकारने विराट लाल वादळाला माघारी पाठवले. नाशिकच्या पेठ तालुक्मयातून साधारणपणे 1500 आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते, मात्र आजही त्यांच्या पदरी निराशा आहे. गेल्या दोन महिन्यात आदिवासी बांधव त्यांच्या कामाला लागले, गृहिणी दैनंदिन कामात व्यस्त झाल्यात, तर पुरूषांची रोजगारासाठी भटकंती सुरू झाली. पायांना फोड येईपर्यंत, उन्हाचे चटके सहन करून कसलीही तमा न बाळगता लाल वादळ मुंबईत धडकल होते. मात्र त्याचा उपयोग काहीच झाला नाही. गावात ना मोजणी सुरू आहे, ना सरकारी अधिकाऱयांनी संपर्क साधला, त्यामुळेच पुन्हा एकदा लढाईचा निर्धार आदिवासी बांधवांनी केला आहे.

Related posts: