|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » Top News » रमेश कराडांचा निर्णय निवडणुकीनंतर : धनंजय मुंडे

रमेश कराडांचा निर्णय निवडणुकीनंतर : धनंजय मुंडे 

ऑनलाईन टीम / लातूर :

विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज ऐनमोक्यावर माघार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारे रमेश कराड सध्या राष्ट्रवादीच आहेत. पक्ष त्यांच्या बाबत निवडणुकीनंतर योग्य निर्णय घेईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. त्यांना विधानपरिषदेचे तिकीटही देण्यात आले. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे यांच्यावर नामुष्की ओढावली. या सर्व नाटय़ानंतर काल लातूर येथे काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला रमेश कराड गैरहजर होते. आज ते राष्ट्रवादीत आहेत. मात्र त्यांनी केलेल्या कृतीनंतर निवडणुकीचा निकाल लागल्यावर पक्ष त्यांच्यावर निर्णय घेईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. राज्यात एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यावर त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची पहिलीच घटना घडली आहे. रमेश कराड राष्ट्रवादीत आहेत, मात्र निकालानंतर पक्ष काय ठरवणार आहे ते आपल्याला कळवण्यात येईल, असे धनंजय मुंडे म्हणाले. लातूर येथील विधानपरिषदेच्या उमेदवाऱयाच्या प्रचार बैठकीला आले असता ते बोलत होते.

Related posts: