|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पक्षवाढीसाठी पूर्णवेळ देणार

पक्षवाढीसाठी पूर्णवेळ देणार 

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सुरेश दळवी यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी बुथ कमिटीपासून जि. . मतदारसंघापर्यंत समन्वयक नेमावेत. त्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून आवश्यक सहकार्य केले जाईल. पक्षवाढीसाठी पूर्णवेळ उपलब्ध राहणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुरेश दळवी यांनी ओरोस येथे काँग्रेस पदाधिकाऱयांच्या बैठकीत केले.

जिल्हा काँग्रेसच्या ओरोस येथील जिल्हा कार्यालयाला भेट देत दळवी यांनी काँग्रेस पदाधिकाऱयांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विकास सावंत, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ टोमके, प्रकाश जैतापकर, प्रदेश
प्रतिनिधी साईनाथ चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा नीता राणे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष एम. एम. सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष आबा मुंज, अरविंद मोंडकर, संतोष टक्के, आशिष जेठे, संदीप कदम, विजय कुडतरकर, सुशिल परब, महेश लुडबे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाला कुणीही कितीही आव्हान दिले तरी काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत रुजलेली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडून कार्यकर्ते कुठेही जाणार नाहीत. त्यासाठी त्यांना जागृत करून त्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. त्यामुळे बुथ कमिटीपासून जि. . मतदारसंघ कमिटीपर्यंत समन्वयक नेमून पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दळवी यांनी दिल्या. तसेच कार्यकर्त्यांना सर्व प्रकारचे पाठबळ देण्यासाठी पूर्णवेळ जिल्हय़ासाठी उपलब्ध राहणार असल्याची ग्वाही दिली.

सोमनाथ टोमके समन्वयक

जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सोमनाथ टोमके यांची सावंतवाडी, वेंगुर्ले विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस दळवी यांनी त्यांना नियुक्ती पत्र काँग्रेस आढवा बैठकीत दिले. यावेळी प्रदेश काँग्रेस सेवादलाचे सरचिटणीस तथा जिल्हा निरीक्षक सत्यवान राऊत उपस्थित होते.