|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इस्रायलच्या गोळीबारात 37 पॅलेस्टाईनींचा मृत्यू

इस्रायलच्या गोळीबारात 37 पॅलेस्टाईनींचा मृत्यू 

गाझा सिटी :

 गाझा सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीदरम्यान इस्रायलच्या गोळीबारात आतापर्यंत 37 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती गाझा आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. अमेरिकेने स्वतःचा दूतावास जेरूसलेम येथे स्थलांतरित केल्याने गाझा सीमेवरील तणाव वाढला आहे. इस्रायलचे सैनिक आणि पॅलेस्टाईनच्या निदर्शकांदरम्यान दररोज संघर्ष होत आहे. सोमवारी देखील सीमावर्ती भागात हजारो नागरिक जमा झाले तसेच यावेळी इस्रायलच्या सैनिकांसोबत त्यांचा संघर्ष देखील झाला.पॅलेस्टाईनच्या नागरिकांनी हिंसक निदर्शने चालविली असल्याने इस्रायलने बळाचा वापर चालविला आहे. गाझा सीमेची कोंडी करत इस्रायलने हिंसक निदर्शने रोखण्याचे प्रयत्न चालविले आहेत.