|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » क्रिडा » रहाणेला 12 लाखांचा दंड

रहाणेला 12 लाखांचा दंड 

वृत्तसंस्था/ मुंबई

अकराव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला आयपीएलच्या नियंत्रण समितीने 12 लाख रूपयांचा दंड ठोठविला आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्स संघाविरूद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला षटकांची गती राखता आली नसल्यानें हा दंड करण्यात आला आहे.

रविवारी झालेल्या या सामन्यात बटलरने नाबाद 94 धावा खेळी करत राजस्थान रॉयल्सला सात गडय़ांनी विजय मिळवून दिला होता. या स्पर्धेतील बटलरचे हे सलग पाचवे अर्धशतक आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला निर्धारित वेळेत आपली षटके पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे त्यांनी आयपीएल नियमचा भंग केला आहे. राजस्थान रॉयल्सचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध मंगळवारी इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे.