|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावच्या युवकांना घडली लतादिदींची भेट

बेळगावच्या युवकांना घडली लतादिदींची भेट 

प्रतिनिधी/ बेळगाव

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुंबई येथे ‘स्वरमाउली’ हा सन्मान देऊन गौरविण्यात आले. या सन्मानपत्र वितरणाच्या सोहळय़ात सहभागी होऊन बेळगावच्या युवकांनी लतादिदींशी संवाद साधला. तसेच त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

लता मंगेशकर यांच्या मुंबई येथील ‘प्रभूकुंज’ निवासस्थानी हा सन्मान सोहळा पार पडला. कोल्हापूर करवीर मठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांनी त्यांना ही पदवी प्रदान केली. या पदवी प्रदान सोहळय़ाप्रसंगी बेळगावातील रोहित देसाई, समीर नाकाडी, प्रसाद नाकाडी हे युवक उपस्थित होते. तसेच मूळचे बेळगावचे असणारे इचलकरंजी येथील रहिवासी प्रा. दिलीप शेंडे आणि दीपश्री शेंडे यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी झाले होते.

समस्त बेळगावकरांच्यावतीने आपण शुभेच्छा देत असल्याचे सांगून या युवकांनी लतादिदींना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी त्या शुभेच्छांचा स्वीकार करून आपले मनोगत व्यक्त केले.

या सोहळय़ाला आशा भोसले, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्या सर्वांची भेट घेऊन संवाद साधण्याची संधी बेळगावच्या युवकांना लाभली आहे. त्यामुळे ही बाब अभिमानास्पद ठरली आहे.

Related posts: