|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » कात्रज घाटात चोरटय़ांनी शस्त्राचे धाक दाखवून दाम्पत्याला लुटले

कात्रज घाटात चोरटय़ांनी शस्त्राचे धाक दाखवून दाम्पत्याला लुटले 

ऑनलाईन टीम / पुणे :

मोटारीतून निघालेल्या दाम्पत्याला तीक्ष शस्त्राचा धाक दाखवून चोरटय़ांनी दागीने आणि रोक रक्कम दोन लाख रूपये लुटल्याची घटना सोमवारी रात्री कात्रज घाटात घडली आहे.

याप्रकरणी भारती विद्याापीठ पोलिसांकडून चोरटय़ांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप शिवराम भोसले यांनी भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार चोरटय़ांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोसले राज्य परिवहन महामंडळात वाहक आहेत. भोसले दाम्पत्य कामानिमित्त पुण्यात आले होते. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास भोसले दाम्पत्य मोटारीतून गावी निघाले होते. कात्रज घाटात तपासणी नाक्मयाजवळ वेगवेगळय़ा दुचाकीवरुन आलेल्या चोरटय़ांनी मोटार थांबविली. भोसले आणि त्यांची पत्नी जयश्री यांना तीक्ष शस्त्राचा धाक दाखविला. जयश्री यांच्या गळय़ातील सोन्याचे दागिने, भोसले यांच्या खिशातील दहा हजारांची रोकड, राज्य परिवहन मंडळाचा वाहक परवाना, आधारकार्ड, पॅनकार्ड असा माल लुटून चोरटे फरार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या भोसले दाम्पत्याने भारती विद्याापीठ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. लुटमारीत पाच चोरटयांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक गुन्हय़ाचा अधिक तपास करत आहेत.