|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तुळस जैतीर उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी

तुळस जैतीर उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी 

वार्ताहर / तुळस:

तुळस येथील श्रीदेव जैतीराचा वार्षिक उत्सव आज मंगळवारी प्रारंभ झाला. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी, मुंबई या भागातील हजारो भाविकांनी मंगळवारी उपस्थित राहून श्रीदेव जैतीराचे दर्शन घेतले.

दक्षिण कोकणातील श्रीदेव जैतीर हे देवस्थान जागृत पर्यटनदृष्टय़ा सुप्रसिद्ध मंदिर आहे. या देवाचा वार्षिक उत्सव हा 11 दिवस चालतो. कवळास या शेवटच्या दिवशीच्या उत्सवाने या उत्सवाची सांगता होते. या देवाचा वार्षिक उत्सव म्हणजे तुळस गावाला मोठी पर्वणीच असते. प्रतिवर्षाप्रमाणे तुळस जैतीर उत्सवाला मंगळवारी सकाळपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. अनेक ठिकाणाहून या गावाच्या माहेरवाशीणी खास उत्सवाला आल्या होत्या. तसेच लांब लांबच्या ठिकाणाहून जैतीर देवतेस मानणाऱया भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. ही गर्दी सायंकाळी मोठय़ा प्रमाणात वाढली. विविध दुकानाबरोबरच शेती कामासाठी लागणारी अवजारे विक्रीसाठी होती.

श्री देव जैतीराचा उत्सव हा 11 दिवसांचा असतो. 15 ते 24 मे या कालावधीत चालणार आहे. पहिल्याच दिवशी उत्सवास जशी अलोट गर्दी होते. तशीच गर्दी कवळास या शेवटच्या दिवशीच्या उत्सवास होते. जैतीर उत्सवाच्या पाचव्या दिवसांपासून श्री देव जैतीर हा या गावातील प्रत्येक वाडीतील घराघरांकडे जाऊन येतो. कवळास या शेवटच्या म्हणजे 11 व्या दिवशीच्या उत्सवाने जैतीर उत्सवाची सांगता होते. या उत्सवासाठी वेंगुर्ले आगारातून भाविकांसाठी प्रवासाची सोय करण्यात आली होती.

Related posts: