|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘ई-मॅमल’साठी रत्नागिरीसह सात जिल्हय़ांतील वीस शाळांची निवड  

‘ई-मॅमल’साठी रत्नागिरीसह सात जिल्हय़ांतील वीस शाळांची निवड   

दुसऱया टप्प्याला प्रारंभ,

विद्यार्थी घेणार टॅप कॅमेऱयाच्या माध्यमातून वन्यजीवांचा शोध

 

प्रतिनिधी /चिपळूण

  वन्यजीवांची माहिती संकलित करून तिच्या व्यवस्थापनाच्यादृष्टीने कार्यरत असलेल्या ‘ई-मॅमल’ प्रकल्पाच्या दुसऱया टप्प्याला येथील सह्याद्री निसर्ग मित्र, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)च्या सहकार्याने गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून प्रारंभ झाला आहे. यामध्ये पश्चिम घाट आणि कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या 7 जिह्यांतील 20 शाळांचा समावेश आहे. यानिमित्ताने ट्रप कॅमेऱयाच्या माध्यमातून विद्यार्थ्याकडून वन्यजीवांचा शोध घेतला जात आहे.

  सिटीझन सायन्समधील एक प्रकल्प म्हणजेच ई-मॅमल प्रकल्प होय. हे एकप्रकारे सायबर टूल असून कॅमेरा ट्रपिंग प्रतिमा आणि माहिती एकत्रित करणे, संग्रह करणे आणि सामायिक करणे यासाठी ही एक वन्यजीवांबाबत माहिती व्यवस्थापन सिस्टीम आहे. हा प्रकल्प 17 देशांत राबवण्यात येत असून देशात प्रथमच राबवला जात आहे. वन्यजीवाबाबत माहिती मिळवण्याचे काम चालू आहे. देशात सह्याद्रीचा भागात जैवविविधतासंपन्न आहे. बी.एन.एच.एस.ने 2015 साली ई-मॅमल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्गातील आंबोली येथील युनियन इंग्लिश स्कूलसह जय सेवा आदर्श हायस्कूल, पवनी, नागपूर व एसजिएम भडांगे हायस्कूल, वाकी, पालघर या शाळांत हा प्रकल्प राबवत यशस्वीरित्या पहिला टप्पा पूर्ण केला.

   या प्रकल्पाच्या दुसऱया टप्प्यात निवडलेल्या 20 मधील प्रत्येक शाळेला 3 ट्रप कॅमेरे, लॅपटॉप, प्रोजेक्टर, प्रिंटर इंटरनेट, दुर्बीण, बॅटरी व मेमरी कार्डस् आणि माहितीपत्रिका प्रदान केल्या आहेत. विद्यार्थी 5 ते 10चा गट तयार करून कॅमेरे शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात बसवतात व त्यामध्ये आलेले फोटो विद्यार्थी स्वतः ई-मॅमल वेबसाईटवर अपलोड करतात. यावेळी एसएनएमचे प्रकल्प अधिकारी प्रसाद गोंड, सागर रेडीज, अनिकेत देसाई व राजेंद्र हुमारे हे या प्रकल्पाचे परीक्षण करत विद्यार्थ्याना वेळोवेळी सहकार्य करत आहेत.

   मागील वर्षभरात ट्रप कॅमेरे विद्यार्थ्यांद्वारे लावण्यात आले असून त्यामध्ये आलेले फोटो ई-मॅमल वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. ही शास्त्राrय माहिती संशोधनासाठी वापरली जाते. त्यामुळे अनेक संशोधकांचा बराच पैसा व वेळ वाचत आहे. आतापर्यंत कॅमेऱयामध्ये पट्टेरी वाघ, अस्वल आणि बिबटय़ा तसेच दुर्मिळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असणारे खवले मांजर त्याचप्रमाणे साळिंदर आणि सहज आढळणारे भेकर, सांबर, रानडुक्कर, रानटी ससे, काळेमांजर, मुंगूस व माकडे आदी वन्यप्राणी टिपले गेले आहेत. पावसाळय़ात कॅमेरे लावणे शक्य होत नसल्याने प्रकल्पांतर्गत सर्व शाळांत चित्रकला, निबंध, प्रश्नमंजुषा, सर्पजनजागृती आदी उपक्रम राबवण्यात आले. तसेच वन्यजीवांवर आधारित माहितीपट दाखवण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या वन्यजीवांबाबत ज्ञान मिळवणे शक्य झाले व त्यांच्यामध्ये उत्साह व जिज्ञासा निर्माण झाली.

  ‘हा एक अद्वितीय प्रकल्प असून ज्यात निसर्ग संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या प्रकल्पात विद्यार्थ्यांचा सहभाग असून ते त्यांच्या पर्यावरणास विविध दृष्टीकोनातून पाहू शकतील व निसर्ग संवर्धनासाठी पुढे येतील.

राहूल खोत

प्रकल्पाचे भारतीय समन्वयक

बीएनएचएसचे क्युरेटर

ई-मॅमल प्रकल्पामुळे या वयात प्रगत तंत्रज्ञानाचा प्रथम अनुभव घेणारे विद्यार्थी खूपच भाग्यवान आहेत. ते त्यांच्या गावात प्राण्यांचा अभ्यास करत आहेत. विद्यार्थी नक्कीच निसर्गावर प्रेम करतात.

भाऊ काटदरे

अध्यक्ष

सहय़ाद्री निसर्गमित्र, चिपळूण

Related posts: