|Sunday, August 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ईव्हीएमवरून भाजप ‘टार्गेट’

ईव्हीएमवरून भाजप ‘टार्गेट’ 

मुंबई / प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या संशय व्यक्त केला आहे. ईव्हीएमबाबत सर्वांच्या मनात संशय आहे. त्यामुळे भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, सर्व संशय दूर होईल, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला केले आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो, अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भाजपची घोडदौड ही निवडणुकांमध्ये दिसते, पोटनिवडणुकांमध्ये ते हरतात त्यामुळे ईव्हीएमचे गूढ उकललेले नसल्यामुळे संशय पिशाच्च काढून टाकण्यासाठी बॅलेट पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत. भाजपला विश्वास आहे तर एकदाचा फैसला होऊ दे, असे उद्धव ठाकरे यांनी आव्हान केले.
विजयावर विश्वास नाही : जयंत पाटील
कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाची चांगली परिस्थिती होती. काँग्रेसला चांगले वातावरण होते. त्यामुळे त्यांचा विजय होईल असे वाटत होते. बहुसंख्य ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसादही मिळत होता. भाजपचा एकमार्गी विजय मिळणे पटत नाही. माझा विश्वास बसत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटक निवडणूक निकालावर भाजपला लक्ष्य केले.

Related posts: