|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा » ब्राझील संघात नेमारचा समावेश

ब्राझील संघात नेमारचा समावेश 

वृत्तसंस्था/ रिओ डी जानेरो

गेल्या फेब्रुवारी पावलाला झालेल्या दुखापतीनंतर ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमारने एकही सामना खेळलेला नाही. त्याची आता ब्राझीलचा स्टार खेळाडू म्हणून विश्वचषक संघात निवड करण्यात आली आहे. ब्राझीलने आतापर्यंत पाचवेळा विश्वचषक जिंकला असून रशियात होणाऱया स्पर्धेत सहाव्यांदा यश मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

ब्राझील संघाचे प्रशिक्षक टिटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत विश्वचषक संघाची निवड जाहीर केली. नेमारचे फॉर्ममध्ये येणे संघासाठी महत्त्वाचा घटक ठरणार आहे. मात्र या संघाला राईटबॅक दानी अल्वेसला गमवावे लागल्याने एक धक्का बसला आहे. गेल्याच आठवडय़ात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो आता विश्वचषकासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. टिटे यांनी 23 सदस्यीय संघात कोणताही अनपेक्षित बदल केलेला नाही. त्यांनी फक्त अल्वेसच्या जागी डॅनिलो व फॅगनर यांची निवड केली आहे. फॅगनरला ते बऱयाच काळापासून ओळखतात. पण तो सध्या जखमी असला तरी संघाच्या डॉक्टर रॉड्रिगा लास्मार यांनी त्याला रशियात खेळण्याची परवानगी दिली आहे.

विश्वचषक पात्रता फेरीतील सामन्यांत दक्षिण अमेरिकन प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान परतावून लावणाऱया ब्राझीलकडे संभाव्य विजेत्यांपैकी म्हणून पाहिले जाते. विश्वचषकातील त्यांची सलामीची लढत स्वित्झर्लंडविरुद्ध 17 जून रोजी होणार आहे. 23 सदस्यीय ब्राझील संघ पुढीलप्रमाणे : गोलरक्षक-ऍलिसन, कॅसिओ, एडरसन. बचावफळी-डॅनिलो, फॅगनर, मार्सेलो, फिलिप लुईस, मिरांडा, मारकिन्होज. थिएगो सिल्वा, जेरोमल. मध्यफळी-कॅसेमिरो, फर्नांडिन्हो, पॉलिन्हो, रेनाटो ऑगस्टो, फ्रेड, फिलिप कुटिन्हो, विलियन. आघाडी फळी-नेमार, गॅब्रियल जीजस, रॉबर्टो फर्मिनो, डग्लस कोस्टा, टैसन.

Related posts: