|Sunday, August 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » धनगर समाजाचा आरक्षणासाठी 22 रोजी मंत्रालयावर मोर्चा

धनगर समाजाचा आरक्षणासाठी 22 रोजी मंत्रालयावर मोर्चा 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मंत्रालयावर 22 मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा विश्वविक्रमी होणार असून, यातून धनगरी ढोल गर्जनेतून मंत्रालयाबरोबरच संसदही हादरवून सोडले जाईल. भविष्यात या माध्यमातून समाजाचे किमान 25 आमदार होतील आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणाला करायचे हे धनगर समाजचं ठरवेल, असे प्रतिपादन धनगर समाजाचे राज्याध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केले.

22 मे रोजी काढण्यात येणाऱया मोर्चाच्या नियोजनासंदर्भातील बैठक जयसिंगपूर येथील 13 पंथी जैन भवनामध्ये पार पडली. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

माजी आमदार शेंडगे म्हणाले, निवडणुकीपूर्वी बारामतीमध्ये जे आंदोलन झाले होते, त्यावेळी भाजपाचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे सरकार आल्यास पॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु साडेतीन वर्षे उलटून गेली मात्र अद्यापही आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतला नाही. त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी धनगरी ढोल व कैताळांच्या गर्जनेत मंत्रालयासमोर निनाद करण्यात येणार आहे. यातून सरकारच्या कानठळ्या बसवण्यात येतील. या मोर्चात कोल्हापूर जिह्यातून सुमारे अडीच हजार धनगरी ढोल सहभागी होतील, असेही ते म्हणाले.

धनगर समाजोन्नती मंडळाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अशोकराव कोळेकर म्हणाले, सध्या महाराष्ट्राचे राजकारण चांगले पेटत आहे. धनगर समाजाच्या प्रश्नासाठी व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे व त्यांचे चिरंजीव प्रकाश शेंडगे यांनी निस्वार्थीपणे काम केले आहे. त्यामुळे सर्वांनी हातात हात घालून सामाजिक न्यायासाठी काम करण्याची आता वेळ आली आहे. प्रकाश शेंडगे यांच्या पाठिशी सर्वांनी राहून समाजाला न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. समाज एकसंध राहिला तरच पुढील काळात समाजाला किंमत मिळेल, असेही कोळेकर यांनी सांगितले.

शिरोळ तालुक्यातून 600 ढोल सहभागी होतील, अशी माहिती गजानन करे यांनी दिली. तर या मोर्चामध्ये सर्वांनी खांद्यावर घोंगडे व डोक्याला फेटा बांधून सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते कल्लाप्पा गावडे यांनी केले.

धनगर समाज हा सांगली जिह्यामध्ये एकवटलेला आहे तर कोल्हापूर जिह्यात विखुरलेल्या अवस्थेत आहे. जिह्यात अनेक धनगर वाडय़ा आहेत. त्यांचे नाव धनगर वाडा असेच आहे. त्यांचे नामांतर व्हावे, यासाठी आपण यापुढील काळात चळवळ व जागृती निर्माण केली पाहिजे, असे मत मुख्याध्यापक रवी पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी संदीप कारंडे, शंकर पुजारी, सौ. शेंडगे यांनीही मनोगते व्यक्त केली. शिरोळ तालुका अध्यक्ष सोमा गावडे, आण्णाप्पा अवघडी, बाबासाहेब सावगावे, बाबुराव माने, आण्णाप्पा फलटणे, कुमार घुबडे, तानाजी हराळे, अशोक पुजारी (कोथळी), कऱयाप्पा ईटाज, रघुनाथ पुजारी, सुरेश देबाजे, सुभाष देबाजे, बंडू बरगाले, संदीप देबाजे, राजू पुजारी यांच्यासह शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आभार म्हैशाळे यांनी मानले.

Related posts: