|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सेनेबरोबर युती शक्य, निर्णय त्यांनीच घ्यावा : आ.गाडगीळ

सेनेबरोबर युती शक्य, निर्णय त्यांनीच घ्यावा : आ.गाडगीळ 

प्रतिनिधी/ सांगली

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्याची आमची इच्छा आहे. पण, निर्णय त्यांनीच घ्यायचा असल्याचे सांगत आ. सुधीर गाडगीळ यांनी युतीचा चेंडू सेनेच्या कोर्टात टोलवला आहे. भाजपातर्फे इच्छुकांचे अर्ज मागणी करण्यात आले आहेत. आतापर्यंत तीनशे जणांनी मागणी केली आहे. आणखी आठ दिवस मुदत आहे. युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा पक्षाचा विचार आहे. पण, निर्णय सर्व्हेनंतरच कोअर कमिटी घेणार असल्याचेही आ. गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

 कर्नाटक विधानसभा विजयानंतर आ. गाडगीळ यांनी आपल्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. आ. गाडगीळ म्हणाले, महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्यावर भाजपा सकारात्मक आहे. मनपातील भ्रष्टाचारी काँग्रेस, राष्ट्रवादीला हटवायचे असेल तर युतीची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत. पण, निर्णय शिवसेनेनेच घ्यायचा आहे. युतीमधील जागा वाटप आणि अन्य बाबींची चर्चाही होईल. पण, त्यापूर्वी आधी एकत्र बसले पाहिजे, असेही आ. गाडगीळ यांनी स्पष्ट केले. भाजपाने स्वतंत्रपणे तयारी सुरू केली आहे. इच्छुकांकडून अर्ज मागणी करण्यात आले होते. आतार्यंत तीनशे जणांनी अर्ज नेले आहेत. आणखी आठ दिवस शिल्लक आहेत.

 त्यानंतर आलेल्या अर्जाची छाननी करण्यात येईल. इच्छुकांची यादी तयार करून प्राथमिक सर्व्हे करण्यात येणार आहे. सर्व्हेनंतरही शिल्लक राहिलेल्या इच्छुकांबाबत पुन्हा सर्व्हे करण्यात येईल. त्यानंतरच कोअर कमिटी उमेदवारीबाबत नेत्यांकडे शिफारस करेल अशी आपल्या पक्षाचीच शिस्त असल्याचे सांगून आ. गाडगीळ म्हणाले, आमची युवा कार्यकर्त्यांची फळी भक्कम आहे. गेल्या तीन वर्षापासूनच कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे. लोकांनाही बदल हवा आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आम्ही जास्तीत जास्त युवा चेहऱयांनाच पसंती देणार असल्याचे सांगून आपले युवक कार्यकर्ते सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले.

निकष लावूनच प्रवेश

 भाजपामध्ये प्रवेश करण्यास अनेक आजी-माजी नगरसेवकांबरोबरच अन्य पक्षांचे कार्यकर्तेही इच्छुक आहेत. पण, निवडणूक येण्याचा निकष असला तरीही संबंधितांची काम करण्याची दिशा आणि नैतिकता या दोन्ही बाबीही तपासण्यात येणार असल्योही आ. गाडगीळ यांनी सांगितले. लवकरच अन्य पक्षातील काही लोकांचा प्रवेश सुरू होईल असा दावाही त्यांनी यावेळी केला. कर्नाटकचा विजय हा विकासाचा मुद्दा आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नेतृत्वाचा विजय आहे. सांगलीतही जातीपातीऐवजी विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढवण्यात येणार आहे. महापालिकेवर भाजपाचीच सत्ता येईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला

Related posts: