|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ऑक्टोबरपासून सर्व खात्यांत ‘कॅशलेस’ व्यवहार

ऑक्टोबरपासून सर्व खात्यांत ‘कॅशलेस’ व्यवहार 

राज्य सरकारचा एसबीआयशी करार सर्व खात्यांना मिळून 600 पीओएस

प्रतिनिधी/ पणजी

गोवा हे देशातील पहिले कॅशलेस अर्थात डिजिटल राज्य करण्यासाठी सरकारने पावले उचलली असून लेखा संचालनालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाशी (एसबीआय) पीओएस मशीनसाठी समन्वय करार केला आहे. त्या करारानुसार राज्यातील सरकारी खात्यांकरिता सुमारे 600 मशीन पुरवली जाणार असून येत्या 1 ऑक्टोबरपासून सर्व सरकारी खाती कॅशलेस करण्याची योजना आहे.

लेखा संचालनालयाचे संचालक पी. आर. परेरा यांनी सर्व सरकारी खात्यांना वरील आशयाचे परिपत्रक पाठवले असून त्यात वरील माहिती देण्यात आली आहे. सरकारी खात्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया पीओएस मशीन पुरवणार असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 1 ऑक्टोबरनंतर रोखीने व्यवहार सरकारी खात्यातून बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची कार्यवाही करण्यासाठी आणि डिजिटल इंडिया अंतर्गत गोवा पूर्णपणे कॅशलेस राज्य बनवण्याच्या हेतूने सदर पीओइस मशीनची कृती करण्यात येणार आहे.

प्रत्येक खात्याल एक पीओएस मशीन

1 एप्रिल 2018 पासून सहा महिन्यांनंतर सरकारचे पैशांचे व्यवहार कॅशलेस होणार असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी जाहीर केले होते. सहा महिन्यांच्या अवधीनंतर म्हणजे 1 ऑक्टोबर 2018 पासून त्याची कार्यवाही होणार आहे. प्रत्येक सरकारी खात्यास करारानुसार एक एक पीओएस मशीन देण्यात येणार असून केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमानुसार सदर कार्यवाही केली जाणार आहे. सरकारच्या काही खात्यांत यापूर्वीच डिजिटल व्यवहार सुरू करण्यात आल असून महसूल, वाहतूक, सार्वजनिक बांधकाम या खात्यांचा त्यात समावेश आहे.