|Sunday, August 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कर्नाटक निवडणुकीत पदोपदी ‘गोवा कनेक्शन’

कर्नाटक निवडणुकीत पदोपदी ‘गोवा कनेक्शन’ 

प्रतिनिधी/ पणजी

निवडणूक कर्नाटकात. परंतु गोवा मात्र नेहमीच चर्चेत राहिला. या निवडणुकीत कर्नाटकातच नव्हे तर देशात सर्वत्र गोवा चर्चेत राहिला. कर्नाटकात भाजप सर्वाधिक जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरून देखील त्यांच्याकडील सत्ता काँग्रेसने खेचून घेतली त्याचे कनेक्शनही गोवाच ठरले.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार गेले पाच सहा महिने चालू होता व त्यात गोव्याचे कनेक्शन हे म्हादई नदीमुळे होते. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत म्हादई हा एक ज्वलंत विषय होता. गोव्याच्या विरोधात बोलणाऱयांमध्ये केवळ काँग्रेसचे नेते होते, असे नव्हे तर भाजपचे नेते देखील होते. निवडणूक झाल्यानंतर भाजप सत्तेवर आल्यास म्हादईचे पाणी कर्नाटकाला मिळवून देऊ, अशी घोषणाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कर्नाटकात केली होती.

जशास तसे उत्तर

आता निवडणूक निकालानंतर भाजप हा सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे. बहुमतासाठी भाजपला केवळ 7 जागा कमी पडल्या असल्या तरी देखील भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने सर्वात कमी जागा 38 मिळविलेल्या जनता दलाला मुख्यमंत्रीपद देऊन काँग्रेसने भाजपला धडा शिकवला. मात्र सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याने भाजपला सत्ता स्थापनेसाठी प्रथम संधी मिळाली पाहिजे असे निवेदन भाजप नेत्यांनी केले असता गोव्यातील राजकीय घटना काँग्रेस नेत्यांनी उद्घृत केल्या. गोव्यात काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी केवळ 4 जागा कमी पडल्या होत्या. अशावेळी भाजपने कपटनीतीने काँग्रेसच्या हातची सत्ता खेचून घेण्यासाठी सर्व छोटय़ा छोटय़ा पक्षांना एकत्र केले होते. सर्वात मोठा राजकीय पक्ष असूनसुद्धा गोव्यात काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी देण्यात आले नाही. मणिपूर व मेघालय मध्ये देखील भाजपने हाच प्रकार केला.

काँग्रेसने भाजपला जशास तसे उत्तर देताना ’गोवा कनेक्शन’ हा एक आदर्श ठेवला. गोव्यातील राजकीय घटनेचे आता कर्नाटकात पडसाद उमटले आहेत. भाजपने गोव्यात जी रणनीती वापरली, जी नवी सूत्रे वापरली त्याच सूत्रांचा वापर आता काँग्रेस पक्ष कर्नाटकात करत आहे. गोव्यात एक व कर्नाटकात दुसरे धोरण वापरता येणार नाही. गोव्यातील राजकीय निर्णयाचा कर्नाटकात काँग्रेसला आधार मिळाला व फायदाही झाला.

Related posts: