|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » Top News » ही लाट कानडी जनतेची : शिवसेना

ही लाट कानडी जनतेची : शिवसेना 

ऑनलाईन टीम / मुंबई :

’कर्नाटकच्या विजयाने भाजपने 16 वे राज्य खिशात घातले व ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लहर असल्याचे नव्याने सांगितले गेले. ही लहर मोदींची नसून कानडी जनतेची आहे. आली लहर केला कहर असे कानडी जनतेने दाखवून दिले,’ अशी खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

 

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ’सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला टोले लगावले आहेत. ’कर्नाटकात कमी जागा जिंकूनही काँग्रेसच्या मतांची टक्केवारी घटलेली नाही व मोठा विजय मिळवूनही भाजपची टक्केवारी वाढलेली नाही. हे काही मोदी लहर असल्याचे लक्षण नाही. अर्थात भाजपने विजय मिळवला असला तरी विधानसभा त्रिशंकू आहे. काँग्रेस व देवेगौडांचा जनता दल एकत्र येऊन भाजपने पकवलेली खिचडी बिघडवू शकतात. भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळाला हे मान्य, पण सत्तेची ‘हंडी’ त्यांच्यासाठी अद्याप लटकलेलीच आहे. त्यात काँग्रेसने देवेगौडांच्या पक्षाला सत्ता स्थापनेची आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन ही ‘हंडी’ आणखी वर नेऊन ठेवली आहे,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला आहे.

 

 

 

 

Related posts: