|Sunday, October 21, 2018
You are here: Home » Top News » भाजपाने मंत्रिपदाची ऑफर दिली : काँग्रेसचा दावा

भाजपाने मंत्रिपदाची ऑफर दिली : काँग्रेसचा दावा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कर्नाटकमधील निवडणुकांचे मंगळवारी निकाल जाहीर झाल्यानंतर बहुमतासाठी आवश्यक जागा मिळवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तास्थापन करण्यासाठी पुरेपर प्रयत्न करण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करून सत्ता स्थापनेच दावा केला आहे.

ग्रेसचे सहा लिंगायत आमदार नाराज असल्याचे वृत्त काही माध्यमांत आले होते. त्याचदरम्यान पाटील यांनी हा दावा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी भाजपाकडून काँग्रेस आणि जेडीएस आमदारांना इडी आणि प्राप्तकिर विभागाकडून छापे टाकण्याची धमकी दिली जाण्याची शक्मयता वर्तवली आहे.मंगळवारी सकाळी मतमोजणीवेळी भाजपाने 120 हून अधिक जागांवर आघाडी घेतली होती. परंतु, नंतर ही आघाडी कमी होत 104 वर स्थिरावली. त्यामुळे भाजपाला बहुमतासाठी आवश्यक असलेला 113 हा जादुई आकडा गाठण्यात यश आले नाही. दुसरीकडे काँग्रेस 78 आणि जेडीएस यांनी 37 जागा पटकावल्या. या दोन्ही पक्षांनी आघाडी करत सत्ता स्थापन करण्यार असल्याचे म्हटले आहे.

विधानसभेची ही स्थिती पाहता एकमेकांना सत्तेपासून रोखण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. मंगळवारी संध्याकाळपासूनच फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

Related posts: