|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » डायनॅमिक कंपनीत कर्मचाऱयाकडून मॅनेजरला मारहाण

डायनॅमिक कंपनीत कर्मचाऱयाकडून मॅनेजरला मारहाण 

ऑनलाईन टीम / नाशिक :

सातपूर परिसरात असणाऱया डायनॅमिक कंपनीतील कर्मचाऱयाकडून मॅनेजरला मारहाण केल्याची घटना सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर आली आहे. डायनॅमिक कंपनीने कर्मचाऱयांना नोटीस पाठविल्याच्या रागातून मॅनेजरला मारहाण झाल्याची माहिती समजत आहे.

मॅनेजरला मारहाण झाल्याची घटना कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र.126 वरील डायनॅमिक प्रा.लि. कंपनीतील कामगार सुरेश चव्हाण यास व्यवस्थापनाने बजावलेल्या नोटीसीचा राग आल्याने चव्हाण याने कंपनीतील अधिकारी सचिन भीमराव दळवी यास लोखंडी रॉडने मारहाण केली. दळवी यांनी सातपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चव्हाण आणि सिंग या दोघा कामगारांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. सदर कंपनीत माजी महापौर अशोक मुर्तडक यांची महाराष्ट्र औद्योगिक कामगार सेना युनियन कार्यरत आहे. व्यवस्थापनाला मारहाण करणाऱया दोघा कामगारांवर भादवी 323, 324, 506, 34 अन्वये सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts: