|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » राज्यात 72 हजार रिक्त पदे भरण्याची सरकारची परवानगी

राज्यात 72 हजार रिक्त पदे भरण्याची सरकारची परवानगी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ग्रामीण भागातील प्रशासकीय यंक्षणेला सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने पाऊल समो टाकले आहे. प्रशासकीय विभागातील 72 हजार रिक्त पदे भरण्यासाठीची मंजूरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यातील या वर्षी 36 हजार, तर पुढील वर्षी 36 हजार पदांची भरती केली जाणार आहे.

विशेष म्हणजे कृषी खाते आणि कृषी खात्याशी संबंधित पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. हे आर्थिक वर्ष पूर्ण होण्याच्या आता ही पदे भरली जातील. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गाव पातळीवर कृषी विषयक कामे होत नसल्याची ओरड गेली अनेक दिवस सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, पांडुरंग फुंडकर यांनी दिली. राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास करून, शेतकऱयांचे जीवनमान उंचावण्यासह ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागांमधील रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्य शासनातील 36 हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली आहे.

मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रशासनातील विविध विभागांच्या एकूण 72 हजार रिक्त जागा दोन टप्प्यात भरण्यात येतील, असे जाहीर केले होते. यावर्षी पहिल्या टप्प्यात 36 हजार तर दुसऱया टप्प्यात पुढच्या वषी 36 हजार पदभरती करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. या जागा भरताना ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेषतः कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध विभागांतील रिक्त पदे अग्रक्रमाने भरण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील विविध पायाभूत आणि जीवनावश्यक सुविधा देण्यातही अडचणी येत असल्याने कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱया 36 हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील 11 हजार 5 पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील 10 हजार 568 पदे, गृह विभागातील 7 हजार 111 पदे, कृषी विभागातील 2 हजार 572 पदे, पशुसंवर्धन विभागातील 1 हजार 47 पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील 837 पदे, जलसंपदा विभागातील 827 पदे, जलसंधारण विभागातील 423 पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील 90 या पदांसह नगरविकास

कोणत्या विभागात किती पदे भरली जाणार आहेत ?

  • ग्रामविकास विभाग- 11 हजार 5 पदे
  • आरोग्य विभाग- 10 हजार 568 पदे
  • गृह विभाग- 7 हजार 111 पदे
  • कृषी विभाग- 2 हजार 572 पदे
  • पशुसंवर्धन विभाग- 1 हजार 47 पदे
  • सार्वजनिक बांधकाम विभाग -837 पदे
  • जलसंपदा विभाग- 827 पदे
  • जलसंधारण विभाग- 423 पदे
  • मत्स्यव्यवसाय विकास विभाग- 90
  • नगरविकास विभाग- 1 हजार 664 पदे

Related posts: