|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » भोगल्यांच्या घरातच ‘गाव गाता गजाली’

भोगल्यांच्या घरातच ‘गाव गाता गजाली’ 

मालवणी बोली शिक्षणासाठी अमालवणी भाषिकांची कार्यशाळा

अजय कांडर / कणकवली:

मालवणी माणूसच मालवणी बोली बोलायला कमीपणाचे मानत असतो. पण कोणतीही बोली भाषा लहानमोठी नसते. ती आपल्या प्रमाण भाषेलाही समृद्ध करीत असते. म्हणूनच महाराष्ट्राच्या वेगवेगळय़ा भागातील अमालवणी भाषिकांनी मालवणी भाषा शिकण्यासाठीगाव गाता गजालीया गाजलेल्या मालिकेचे कथा लेखक प्रभाकर भोगले यांच्या कळसुली (ता. कणकवली) गावी भेट दिली आणि भोगलेंच्या घरातच मालवणी गजाली ऐकत मालवणी भाषा संवादाचे प्रशिक्षण घेतले.

आपल्या बोलीला दुर्लक्षित करण्याचा अनुभव सार्वत्रिक असतानाच मालवणी बोलीची समृद्धी एवढी की, आता मालवणी बोली शिकण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या दूर टोकावरच्या नागपूर, सोलापूर आणि पुणेमुंबईकडील अमालवणी भाषिकांकडून केला जात आहे. मालवणी भाषेचे ज्येष्ठ संशोधक डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या मालवणी भाषेचे हे शिक्षण सुरू असून मालवणीचे शिक्षण घेणाऱया या सर्व भाषाप्रेमींनी मालवणी भाषेच्या संवाद प्रात्यक्षिकासाठी भोगले यांच्या घरी भेट देऊन दिवसभर भोगले आणि गावातील इतर स्त्राr-पुरुषांशी संवाद साधत मालवणी बोलीचे प्रशिक्षण घेतले.

कळसुली गडगेवाडी येथे गवळदेव स्थळासमोर भोगले यांचे वडिलोपार्जित घर आहे. तेथे शिरुर (पुणे) येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राचे प्रमुख असलेल्या प्रा. डॉ. लळीत आपल्या संशोधक विद्यार्थी आणि इतर भागातील अमालवणी, मालवणी भाषांप्रेमींसह याअनोख्या गावभेटीलाआले होते. यात भोगले यांनी आपल्या मालवणी साहित्यात गावातील शब्दबद्ध केलेली स्थळे, माणसे यांची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. स्थळांची पाहणी करण्यात आली. यात कळसुली गडगेवाडी येथील गवळदेव, माऊलीचे स्थान, देवराई, क्षेत्रपाल, गडगेश्वराचा डोंगर, चांदेलचा परिसर, कळसुली शाळा आदी स्थळांचा समावेश होता. दरम्यान, प्रत्येक ठिकाणी प्रभाकर भोगले आपल्या साहित्यातील स्थळे प्रत्यक्षातील स्थळ यातील भावविश्व उलगडून दाखवित होते. ते ऐकताना मालवणी भाषाप्रेमी, मालवणी मुलूख, मालवणी माणसांची स्वभाव वैशिष्टय़े आणि मालवणी बोली समजून घेत होते.

यावेळी भोगले म्हणाले, माझ्या गावातील माणसे, निसर्ग, गुरेढोरे, रानमाळ, भातमळे, वहाळ नि देवराई, आजूबाजूचे गूढ वातावरण यांनी लहानपणापासून माझे भावविश्व अनुभवसंपन्न केले आणि गाव सोडल्यावर मी तो आशय शब्दबद्ध करू लागलो. मला नकळत कथा, कादंबऱया, नाटक यांचे लेखन झाले. माझी आई लक्ष्मीबाई, नाटककार जयवंत दळवी, डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी माझे कौतूक केले. प्रा. डॉ. लळीत यांनी नुसते कौतूक केले नाही तर, पुणे विद्यापीठात आपली विद्यार्थिनी मनिषा औटी यांना एम.फिल. पदवीच्या प्रबंधासाठी माझ्या कादंबऱयांवर विषय दिला. आज आपण सर्व माझ्या कादंबऱयातील स्थळे पाहायला आलात. एका लेखकाला आयुष्यात आणखी काय हवे?

या गावभेटीत डॉ. बाळासाहेब देवीकर, विठ्ठल सोडनवर, मालवणी भाषा संशोधिका मनीषा औटी (जुन्नर), वर्षा ढोरे, गौरी गावडे त्यांचे इतर सहकारी तसेच राजेश राणे, नितीन राणे आदी सहभागी झाले होते. यावेळी कळसुली गावातील स्त्राr-पुरुषांनी त्यांच्याशी मालवणीतून संवाद साधत मालवणी भाषेच्या संपन्नतेचा अनुभव दिला. तररयत एक अनुभवया गजालीचा कार्यक्रम भोगले आणि डॉ. लळीत यांनी रंगविला. निरोपाच्याक्षणी भोगले यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाला आपली पुस्तके भेट दिली. प्रभाकर भोगले यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

अशीच टिकते बोली

मालवणी बोली शिक्षणासाठी अमालवणिकांनी आपल्या घरीगावी भेट दिली, या संदर्भात भोगले म्हणाले, कोणतीही बोली त्या बोलीच्या साहित्यामुळे टिकते. तशीच त्या बोलीच्या संवादातून टिकत असते. त्यामुळेच अमालवणी भाषिकांनी मालवणी बोलीचा संवाद वाढविण्यासाठी या चालविलेल्या प्रयत्नांचे मोल मोठे आहे.

Related posts: