|Thursday, January 17, 2019
You are here: Home » उद्योग » ओप्पोने पहीला स्मार्टफोन लाँच केला

ओप्पोने पहीला स्मार्टफोन लाँच केला 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ओप्पो मोबाईल कंपनीने मंगळवारी भारतात नवीन आवृत्तीचा रेलमी-1 पहीला स्मार्ट फोन लाँच केला आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी जादा स्टोरेज सुविधा आहे. कंपनीकडून सांगण्यात आले की, हा फोन भारतात तयार करण्यात आलाय. मेमरी कार्ड, फोन मेमरी साठवण्याच्या त्याच्या तीन वेगवेगळय़ा किंमती ठरवण्यात येणार. त्या वेगवेगळय़ा प्रकारामध्ये फोन लाँच करण्यात येऊन सुरुवातीची किंमत 8 हजार 990 रु. ठेवली असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.

किंमती

रेलमी-1 या स्मार्टफोनला 6 जीबी रॅम,128 जीबी फोन मेमरी याची किंमत 13 हजार 990 रुपये.तर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी फोन मेमरी असणाऱया फोनची किंमत 8 हजार 990 रुपयांना मिळेल.ग्राहकांच्या सुविधेकरीता ऍमेजन इंडिया यावर विक्री करण्याकरीता उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.याच्या बरोबरीत एक महिन्याच्या कालावधीनंतर 4 जीबी रॅम व 64 जीबी फोन मेमरी  असणारी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार. मुनलाईट सिलव्हर आणि डायमंड बॅल्क या रंगामध्ये रलमी-1 हा स्मार्ट फोन ग्राहकांच्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.याच्या किंमती 10 हजार 990 रुपये ठेवण्यात येणार आहे. 25 मे रोजी दुपारी 12 पासून पहीली विक्रीसाठी खुला करण्यात येणार आहे.

ऑफर

जियो ग्राहकांने हा फोन खरेदी केल्यास 4850 रुपयापर्यंत फायदा होऊ  शकतो. एसबीआय कार्ड वापरणाऱयांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तर नो कॉस्ट ईएमआईची ऑफर मिळणार.

फोनची रचना

s डिस्प्ले-6 इंच फुल एचडी

s रॅम-3,4,6 जीबी

s फोन मेमरी-32,64,128 जीबी

s ऍन्ड्रायड-8.1 ओरियो

s बॅटरी-3410 एमएएच

s          प्रंट कॅमेरा-8 एमपी

Related posts: