|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ऑनलाईन खरेदीदारांना सोपे ईएमआय पर्याय

ऑनलाईन खरेदीदारांना सोपे ईएमआय पर्याय 

मुंबई

 रिटेल कन्झ्युमर्ससाठी असलेले भारतातील जलद गतीने वाढणारे झेस्टमनी हे डिजिटल कर्ज व्यासपीठ असून त्यांनी आपल्या डिजिटल व्यासपीठावर 5 दशलक्षहून अधिक यूजर्सची नोंद केली आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरीत कर्ज अर्ज सुविधा, त्वरित पेडीट मर्यादेची मान्यता प्रक्रिया आणि सोपी परतफेड सुविधा पुरवण्यात येते. भारतीयांची जीवनशैली आधुनिक करून आपल्या आवडत्या ऑनलाईन शॉपिंग व्यासपीठावरून क्रेडीट कार्डशिवाय कोणतीही वस्तू विकत घेण्याची सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्याच्या हेतूने झेस्टमनीची सुरुवात करण्यात आली.

झेस्टमनीच्या या यशाबद्दल व ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल बोलताना झेस्टमनीच्या सीईओ व सहसंस्थापक लिझी चॅपमॅन म्हणाल्या, ‘झेस्टमन या व्यासपीठावर आम्ही असा विश्वास बाळगतो की, प्रत्येक व्यक्तीला क्रेडीट मिळवण्यचा अधिकार आहे. आणि ग्राहकांचे आयुष्य सुखकर व आनंदी बनवण्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या प्रत्येक वस्तूच्या खरेदीसाठी त्यांना कोणत्याही रकमेचे क्रेडीट देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत. झेस्टमनीचे वापरकर्ते ऑनलाईन माध्यमांतून स्मार्टफोन, स्वयंपाकघरातील उपकरणे, हेडफोन, दूरदर्शन यांची खरेदी आणि शिक्षणासाठीचे वित्तव्यवहार करू शकतात. हे सुनिश्चित करण्यासाठी व ग्राहकांची आवड-निवड जपण्यासाठी आम्ही अलीकडेच शाओमी आणि फ्लिपकार्टसारख्या लोकप्रिय ऑनलाईन रिटेल बॅण्डसशी भागीदारी केली आहे. सध्या आम्ही दररोज 2.5 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करतो.

झेस्टमनी सध्या 200 पेक्षा जास्त किरकोळ भागीदारांसह कार्यरत असून चेकआऊटच्या वेळी विविध आर्थिक पर्याय हे व्यासपीठ ग्राहकांना पुरवते. यामध्ये क्रेडिट कार्डशिवाय ग्राहकांना ईएमआय पर्यायाचा लाभ घेता येतो. झेस्टमनीच्या ग्राहकांना ज्या गोष्टींची गरज असेल, त्यावस्तू त्वरीत विकत घेण्याची क्षमता या व्यासपीठानेच त्यांना दिली असून त्या खरेदीची रक्कम पुढील 36 महिन्यात फेडण्याची सोय आहे. झेस्टमनी ही एक तंत्रज्ञान कंपनी आहे आणि पूर्णपणे नियमन केलेल्या कर्ज संस्थेतर्फे या व्यासपीठावर कर्ज दिले जाते.

Related posts: