|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अशोकनगरमध्ये प्लास्टिक पाईपना आग

अशोकनगरमध्ये प्लास्टिक पाईपना आग 

आगीचे कारण गुलदस्त्यात, धुराचे प्र

प्रतिनिधी/ बेळगाव

अशोकनगर परिसरात साठवून ठेवण्यात आलेल्या प्लास्टिक पाईपना बुधवारी सायंकाळी आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाले असून धुराचे प्रचंड लोळ पाहून अनेक जण घटनास्थळी धावून आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली तरी तोपर्यंत पाईप जळून खाक झाले होते.

धर्मनाथ भवनजवळ स्वीमिंगपूलसाठी पाईप साठवून ठेवण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी या परिसरात अचानक प्रचंड धूर दिसून आला आणि बघता बघता आगीचे लोळही उठले. त्यामुळे तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. मार्केट पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेत केवळ सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अज्ञातांनी या पाईपना आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष अनुदानातून धर्मनाथ भवन सर्कलजवळ स्वीमिंगपूल बांधण्याची योजना होती. यासाठी प्लास्टिक पाईप साठवून ठेवण्यात आले होते. या पाईपना आग लागली आहे. अग्निशमन दलाचे 15 हून अधिक जवान आग विझविण्याच्या कामात गुंतले होते.  

चंड लोळ

Related posts: