|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जर मी येदियुरप्पा असतो तर शपथ घेतली नसती : पी चिदंबरम

जर मी येदियुरप्पा असतो तर शपथ घेतली नसती : पी चिदंबरम 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

त्रिशंकू विधानसभा असलेल्या कर्नाटकात राज्यपाल विजुभाई वाला यांन येदियुरप्पा यांना कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. राज्यपालांनी त्यांना 15 दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालायने येदियुरप्पा यांच्या शपथविधीवर स्थगिती आणण्यास नकार दिला असून शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मात्र यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी ट्वटिरच्या माध्यमातून टीका केली आहे. ‘जर मी येदियुरप्पा असतो जर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत शपथ घेतली नसती’, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

“मी सर्वोच्च न्यायालयाला सॅल्यूट करतो. जर मी येदियुरप्पा असतो तर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होईपर्यंत शपथ घेतली नसती’’, असं ट्वटि चिदंबरम यांनी केलं आहे.पुढे चिदंबरम यांनी म्हटले आहे की, “येदियुरप्पा यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रातून त्यांचा दावा खोटा असल्याचं सिद्ध होईल. पत्रात कुठेही 104 पेक्षा जास्त आकडा असल्याची नोंद नाही. राज्यपालांनी दिलेल्या आमंत्रणातही कोणता आकडा टाकण्यात आलेला नाही’’.

Related posts: