|Monday, August 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कर्नाटकात काँग्रेसचे दोन आमदार गायब

कर्नाटकात काँग्रेसचे दोन आमदार गायब 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कर्नाटकात भाजपाच्या सत्तास्थपनेनंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला राज्यापालांकडून 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. भाजपाने सत्तास्थापन करतान काँग्रेसचे दाने आमदार गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून त दोन्ही आमदार पक्षासोबतच आहेत, असा दावा काँग्रेसने केला आहे.

कर्नाटकात गुरुवारी भाजपा नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, भाजपाकडे 104 जागा असून त्यांना 112 हा निर्णायक संख्याबळाचा आकडा गाठण्यास आणखी आठ आमदारांची गरज आहे. यामुळे कर्नाटकात घोडेबाजार तेजीत येण्याची चिन्हे आहेत. भाजपाकडून आमदार फोडण्याचे प्रयत्न होतील, हे लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या आमदारांना ईगलटोन या रिसोर्टवर नेले होते. मात्र, काँग्रेसचे दोन आमदार गायब झाल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ झाली. मस्कीमधून निवडून आलेले आमदार प्रताप गौडा पाटील आणि बेल्लारीचे आमदार आनंद सिंह हे दोघे ‘गायब’ झाले आहेत. त्या दोघांशी पक्षातील नेत्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

Related posts: