|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » प्रेयशी बोलत नाही म्हणून त्याने घरात घुसून केले शस्त्राने वार

प्रेयशी बोलत नाही म्हणून त्याने घरात घुसून केले शस्त्राने वार 

ऑनलाईन टीम / पिंपरी-चिंचवड :

प्रेयशी बोलत नाही म्हणून नाराज झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून तिच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या भोसरीमध्ये रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.

शाहरूख शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सतरा वषीय अल्पवयीन मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील एक वर्षापासून अल्पवयीन मुलगी आणि शाहरूख शेख यांच्यात प्रेम संबंध होते. शाहरूख त्याच्या 17 वषीय अल्पवयीन प्रेयसीला जबरदस्तीने लॉजवर घेऊन गेला व तिथे जाऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. पुन्हा तो तसाच प्रकार करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु अल्पवयीन मुलीला हे मान्य नव्हते म्हणून तिने प्रियकराचा फोन उचलला नाही, त्याच्याशी बोलणे टाळले. शाहरूख तिला बोलण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला भेटायला बोलवत होता. पण ती मुलगी शाहरूखबरोबर बोलायला टाळाटाळ करत होती. याचा राग मनात धरून शाहरूख मंगळवारी रात्री तिच्या घरी गेला आणि तिच्या गळय़ावर वार केले. यावेळी घरात आई-वडील होते परंतु शाहरूखच्या हातात धारदार शस्त्र असल्याने कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. याप्रकरणी आरोपी शाहरूखला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

Related posts: