|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » औरंगाबाद दंगलप्रकरण : शिवसेना कार्यकर्ता लच्छू पैलवानला अटक

औरंगाबाद दंगलप्रकरण : शिवसेना कार्यकर्ता लच्छू पैलवानला अटक 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

येथील दंगलीप्रकरणी शिवसेनेचा कार्यकर्ता लच्छू पैलवानला अटक करण्यात आली आहे. जाळपोळ करणे, दंगल भडकवणे या आरोपांखाली लच्छू पैलवानला सिटी चौक पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे.

लच्छू पैलवानचे खरे नाव लक्ष्मीनारायण बखरिया आहे. परंतु तो लच्छू पैलवानाच्याच नावाने ओळखला जाता. कलम 143, 144, 436 जाळपोळ, दंगल तसंच 4, 25 भारतीय हत्यार कायदा, 135 महाराष्ट्र पोलिस कायदा या गुह्यांतर्गत लच्छू पैलवानला अटक केली आहे. याअगोदर एमआयएम आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाला अटक करण्यात आली होती. औरंगाबादमधील मोतीकारंजा परिसरात 11 मे रोजी किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली आहेत. या घटनेत आतापर्यंत 30 ते 40 जण जखमी झाले आहेत. तर यात दोघांचा मृत्यू झाला होता.

Related posts: