|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खानापूर रोड आणखी सहा महिने राहणार बंद

खानापूर रोड आणखी सहा महिने राहणार बंद 

उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने मे अखेरपर्यंत पूर्ण होणे अशक्मय

बेळगाव/ प्रतिनिधी

खानापूर रोड येथील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने मे अखेरपर्यंत रस्ता खुला होणे अशक्मय आहे. उड्डाणपुलाच्या दुसऱया बाजुच्या भिंतीचे बांधकाम अद्यापही झाले नसल्याने हे काम आणखी 6 महिने रस्ता खुला होणार नसल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे वाहनधारकांना आणखी 6 महिने अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

उड्डाणपुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होईल असे सांगून खानापूर रोडवरील वाहतूक काँग्रेस रोडमार्गे वळविण्यात आली होती. मात्र, हे काम दिवसेंदिवस वाढत चालले असून मे अखेरपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याची शक्मयता धूसर बनली आहे. रेल्वेमार्ग ते गोगटे चौकपर्यंतच्या एका बाजुचे काम अंतिम टप्प्यात आहे. रस्त्याशेजारी संरक्षक भिंती बांधण्याचे काम सुरू आहे. पण रेल्वे मार्गापासून मराठा मंडळपर्यंतच्या रस्त्याशेजारची भिंत अद्यापही बांधण्यात आली नाही. भिंत बांधण्यासाठी रेल्वे खात्याकडून परवानगी मिळाली नसल्याने कंत्राटदाराने भिंत बांधण्याचे काम पूर्ण केले नव्हते. मात्र रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांच्या माहितीनुसार भिंत बांधण्यासाठी रेल्वे खात्याने नुकताच आराखडय़ाला मंजुरी दिली आहे. यामुळे यानंतर भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. भिंत बांधण्यास किमान दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्मयता आहे.

 रेल्वे मार्गादरम्यानचे लोखंडी गर्डरदेखील अद्याप उपलब्ध झाले नाहीत. एप्रिल अखेरपर्यंत गर्डर उपलब्ध होतील, अशी माहिती रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांनी दिली होती. हे काम नागपूर येथील कंपनीला देण्यात आले आहे. हे गर्डर तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, बेळगावला पाठविण्यात आले आहे. हे पोहोचण्यास आणखी 8 ते 10 दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर रेल्वे मार्गादरम्यान गर्डर ठेवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सदर गर्डर 30 फूट लांबीचे बनविण्यात आले आहेत. मात्र, रेल्वे मार्गादरम्यान 120 फूट लांबीचा एक गर्डर आवश्यक आहे. याकरिता गर्डरची जोडणी करून 120 फूट लांबीचा बनविण्यात येणार आहे. या कामाकरिता पुन्हा 15 दिवसाचा अवधी लागण्याची शक्मयता आहे. अलीकडे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने काम वेळेत होणे अशक्मय आहे. भिंतीचे बांधकाम आणि गर्डर ठेवण्याचे काम पूर्ण होण्यास 3 महिन्याहून अधिक कालावधी लागण्याची शक्मयता आहे. पण भिंतीचे बांधकाम पावसामुळे रखडल्यास पावसानंतरच हे काम पूर्ण होण्याची शक्मयता आहे. उड्डाणपुलाचे काम 3 महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे रेल्वे खात्याचे अधिकारी सांगत आहेत. कामाची गती वाढविण्यात आल्यास हे काम 3 महिन्यात पूर्ण होईल. अन्यथा, उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास 6 महिन्यांहून अधिक कालावधी लागण्याची शक्मयता आहे. यामुळे वाहनधारकांना 6 महिने अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्मयता आहे.

धारवाड रोड उड्डाणपूल खुला करण्यात आला असला तरी काँग्रेस रोड आणि कपिलेश्वर रोडवर वाहतुकीचा ताण जैसे थे आहे. यामुळे उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करून खानापूर रोड खुला करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.