|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » वाहनाच्या धडकेने महिलेचा मृत्यू

वाहनाच्या धडकेने महिलेचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / नरसापूर :

पुणे-सातारा महामार्गावर हॉटेल प्रणव समोर एका अज्ञात दुचाकीस्वाराच्या धडकेने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव कौशल्या बाजीराव थोपटे असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारी दुचाकीवरून प्रवास करत असताना त्यांना पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या कौशल्या बाजीराव थोपटे या महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघात घडल्यावर संबंधित आरोपीने उपचारासाठी मदत न करता तिथून फरार झाला. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर नसरापूर येथील सिध्दीविनायक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गुन्हय़ाचा पुढील तपास करत आहे. दुचाकी चालक गंगादीप माधव नेवसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ते या अपघातात जखमी झालेत.

Related posts: