|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतातील पेयजल साठय़ात वेगाने घट : नासा

भारतातील पेयजल साठय़ात वेगाने घट : नासा 

वॉशिंग्टन

 पेयजल साठय़ांमध्ये वेगाने घट होत आहे, अशा देशांत भारताचाही समावेश आहे. सध्या उपलब्ध असणाऱया स्वच्छ पाण्याचा प्रमाणापेक्षा जास्त वापर होत असल्याचे उपग्रहाच्या साहाय्याने नासाने केलेल्या संशोधनातून समोर आले.

नेचर या जर्नलमध्ये पृथ्वीवरील जलसाठा असणाऱया भागामध्ये पाण्याचे प्रमाण वाढत आहे, तर कोरडय़ा भाग दुष्काळग्रस्त होत आहे. या बदलाचे प्रमुख कारण मानवाकडून जल व्यवस्थापन, हवामान बदल आणि नैसर्गिक साखळी असल्याचे सांगण्यात आले. उत्तर आणि पूर्व भारत, मध्य आशिया, ऑस्टेलिया आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात पाण्याचा गरजेपेक्षा जास्त वापर करण्यात आल्याने पेयजल जलसाठय़ामध्ये वेगाने घट होत आहे. या भागातील सरकारकडून पाण्याचे संवर्धन करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा समस्या अजून गंभीर होण्याचा इशारा देण्यात आला.

जगभरातील 34 प्रांतातील पेयजल साठय़ाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका व जर्मनीच्या सेस (ग्रॅव्हिटी रिकव्हरी ऍण्ड क्लायमेट एक्स्परिमेन्ट) या यानाच्या साहाय्याने गेल्या 14 वर्षांतील साठय़ांचा अभ्यास करण्यात आला. पृथ्वीवरील जलसाठय़ाचा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदाच अनेक उपग्रहांचा वापर करण्यात आला. भूगर्भात जलसाठा निर्माण होण्याच्या तुलनेत तो कुपनलिकेतून उपसण्याचा वेग प्रचंड आहे, असे नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाईट सेन्टरचे मॅट रॉडेल यांनी सांगितले.  तलाव, नद्या, बर्फ, आणि भूगर्भातील स्वच्छ पाणी पिण्यास उपयुक्त आहे.  उत्तर, दक्षिण धृवांवरील बर्फ हवामान बदलाने वितळल्याने पेययुक्त पाणी समुद्रामध्ये जात पातळीमध्ये वाढ होते. काही भागात पाण्याचे साठे स्थिर, तर काही भागात वाढत असल्याचे दिसून आले.

Related posts: