|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » कुमारस्वामी यांच्या शपथविधीला विरोधकांचे शक्तीप्रदर्शन

कुमारस्वामी यांच्या शपथविधीला विरोधकांचे शक्तीप्रदर्शन 

ऑनलाईन टीम / बंगळुरू :

जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी बुधवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत. राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतल्यानंतर यासंबंधी घोषणाबाजी करण्यात आली. देशभरातील प्रमुख 17 विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पाठवले असल्याची माहिती आहे.

भाजपला एकजुटीचा इशारा देण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्यामुळे कुमारस्वामी जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तेव्हा विरोधी पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. देशभरातील प्रमुख 17 विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पाठवल्याची माहिती आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे नेते तर असतील, शिवाय इतर पक्षांचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्मयता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही शपथविधी सोहळय़ासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील सर्व विरोधी पक्षातील नेत्यांनाही निमंत्रण पाठवले जात आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा अध्यक्ष मायावती यांच्यासोबत राष्ट्रीय लोकदलचे नेते अजीत सिंह यांना निमंत्रण पाठवल्याचे बोलले जात आहे. शिवाय ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.