|Friday, May 24, 2019
You are here: Home » मनोरंजन » बकेट लिस्टमधून माधुरीची मोहिनी कायम

बकेट लिस्टमधून माधुरीची मोहिनी कायम 

मकरसंक्रांतीचं औचित्य साधत, महाराष्ट्राच्या लाडक्या धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाचं ‘बकेट लिस्ट’ हे नाव ट्विटरवर घोषित करून यानिमित्ताने लाँच करण्यात आलेल्या टायटल टीझर पोस्टरवरील माधुरीचा मराठमोळेपणा तिच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवण्यात यशस्वी ठरला. बॉलिवूडची मराठमोळी अप्सरा माधुरी दीक्षित मराठीत अवतरणार हे ऐकल्यापासून तिचा हा पहिला मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’ पाहण्यासाठी सगळेच आसुसले आहेत. माधुरीच्या चाहत्यांच्या मनातली ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. येत्या 25 मे पासून ‘बकेट लिस्ट’ चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.

गेली तीन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी माधुरी आपल्या मातफभाषेत कधी सिनेमा करणार असा प्रश्न कित्येक चाहत्यांच्या मनात होता, अखेर बॉलिवूडची ही धकधक गर्ल बकेट लिस्टच्यानिमित्ताने मराठीत पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. सिनेसफष्टीत काम करायला सुरुवात केल्यापासून चांगल्या मराठी संहितेच्या शोधात असणारी माधुरी कथा ऐकताक्षणी या कथेच्या प्रेमात पडली आणि या चित्रपटाला तिने होकार कळवला. सगळय़ात कमी लेखलं जाणारं काम म्हणजे गफहिणीचं… या कामाला तितकसं महत्त्व शक्यतो दिलं जात नाही… सातत्याने आपल्या परिवारासाठी झटणाऱया याच गफहिणीची कथा माधुरी आपल्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपट बकेट लिस्टच्या निमित्ताने आपल्यासमोर घेऊन येत आहे. या सिनेमातून एक गफहिणी साकारत असलेल्या आई, मैत्रीण, बहिण, मुलगी अशा विविध भूमिकांमध्ये माधुरी आपल्याला दिसणार आहे. या सगळय़ाच भूमिका उत्कृष्टरित्या साकारताना आपल्या वेगळेपणातून प्रेक्षकांची करमणूक करण्यात माधुरी साकारत असलेली सानेंची सून यशस्वी होईल, असा विश्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी दर्शवला आहे.

माधुरीबरोबरच सुमित राघवन, वंदना गुप्ते, शुभा खोटे, प्रदीप वेलणकर, सुमेध मुडगलकर, दिलीप प्रभावळकर, इला भाटे, रेणुका शहाणे, कृतिका देव, मिलिंद पाठक, शालवा किंजवडेकर यांसारखे मातब्बर कलाकार या चित्रपटात आहेत. ‘बकेट लिस्ट’ चित्रपटात एकूण तीन गाणी असून त्यापैकी दोन गाणी सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात आली असून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. होऊन जाऊ द्या हे गाणं श्रेया घोषाल, साधना सरगम आणि शान या सुराधिशांच्या स्वरांनी सजलेलं आहे. तर तू परी हे गाणं श्रेया घोषाल आणि रोहन प्रधान यांनी गायले आहे. चित्रपटातील सर्व गाणी रोहन- रोहन या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेली असून, मंदार चोळकर यांच्या लेखणीतून ती अवतरलेली आहेत.

या चित्रपटाबद्दल व्यक्त होताना माधुरी म्हणते की, ‘बकेट लिस्ट’ हा एक चित्रपट, माझ्या कितीतरी इच्छा पूर्णत्वास नेतोय… गेल्या कित्येक वर्षात मराठी चित्रपट करण्याची अपुरी राहिलेली इच्छा यानिमित्ताने पूर्ण झाली तर मराठीमध्ये हाताळल्या जाणाऱया विषयांपैकी एका सुंदर कलाकृतीचा भाग मला होता आलं आणि आता करण जोहरची ही गोड भेट… मराठी प्रेक्षकांबरोबरच माझ्यासाठी हा एक सुंदर अनुभव आहे. निर्माता करण जोहर प्रथमच ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसफष्टीत एक प्रस्तुतकर्ता म्हणून पदार्पण करीत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले असून सहलेखिकेची धुरा देवश्री शिवाडेकर हिने सांभाळली आहे.

Related posts: