|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » विविधा » एव्हरेस्टवर मनीषा वाघमारेनी केली माहीम फत्ते

एव्हरेस्टवर मनीषा वाघमारेनी केली माहीम फत्ते 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

आंतरराष्ट्रीय महिला गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिने सर्वोच्च उंचीवर असणारे शिखर माऊंट एव्हरेस्टवर आज यशस्वी चढाई केली.

ही मोहीम फत्ते करणारी ती मराठवाडय़ाची पहिली महिला गिर्यारोहक ठरली. या वषी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या मनीषाने 17 मे रोजी रात्री एक वाजता बेस कॅम्पवरून एव्हरेस्ट शिखराच्या कॅम्प 1 कडे कूच केली होती. रविवारी एव्हरेस्टच्या कॅम्प 4 वर पोहोचली. हवामान अनुकूल असल्याने ती रविवारी जगातील सर्वोच्च उंचीवर 8 हजार 840 मीटर असणारे एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्यासाठी निघाली. आज सकाळी 8 वाजून 10 मिनिटाला तिने हे शिखर सर करत एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली. अशी माहिती आयसीएफचे कमांडर यांनी दिली. या यशस्वी चढाईनंतर ती माघारी फिरली असून तिचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. गतवषी निसर्गाने रौद्ररूप धारण केल्यामुळे इंडियन कॅडेट फोर्सची कॅडेट असलेली मनीषा एव्हरेस्ट सर करण्यापासून अवघ्या 170 मीटरपासून वंचित राहिली होती; परंतु या वषी नव्या उमेदीने व जिद्दीने ती 4 एप्रिल रोजी एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना झाली होती. त्याच दिवशी ती काठमांडू येथे पोहोचली होती. त्यानंतर तेथील हवामानाशी जुळवून घेण्यासाठी तिने 45 दिवसांच्या कालावधीत कालापथ्थर, पमोरी हाय कॅम्प तसेच 28 एप्रिल ते 1 मेदरम्यान तिने बेस कॅम्प ते कॅम्प 1, कॅम्प 2 आणि कॅम्प 3 असे रोटेशन्स केले होते.