|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘तेजस’ च्या वर्षपुर्तीबाबत रेल्वे स्टाफ अंधारात!

‘तेजस’ च्या वर्षपुर्तीबाबत रेल्वे स्टाफ अंधारात! 

रत्नागिरी स्थानकात गाडी तासभर उशिरा

पहिले प्रवासी उदय बोडस यांच्याकडून ‘ग्रिटींग्ज’

गाडीच्या स्टाफला बसला सुखद धक्का

प्रतिनिधी /रत्नागिरी

‘यह गाडीके आज एक साल होत गया?’, ‘आप सेलिब्रेट कर रहै पर वहा बंबइमे कुछ नही किया’ हे शब्द आहेत 22119 सीएसटीम – करमाळी ‘तेजस एक्स्प्रेस’ गाडी रत्नागिरी स्थानकात आणलेल्या चालकाचे! ही गाडी सुरू होऊन आज बरोबर एक वर्ष पूर्ण झाले, मात्र या वर्षपुर्तीबाबत रेल्वे स्टाफ अंधारातच असल्याचे दिसून आले. पहिल्या वर्धापनदिनीच ‘तेजस एक्स्प्रेस’ रत्नागिरी स्थानकात तब्बल एक तास उशिरा आल़ी

रेलपॅन गटाचे सदस्य असलेले सीएमए उदय बोडस, सीए चिंतामणी काळे आणि त्यांची कन्या श्रावणी काळे यांनी मंगळवारी ‘तेजस’चा वाढदिवस वेगळ्या प्रकारे साजरा केल़ा सीएमए बोडस यांनी स्वतः बनवलेले वर्डआर्ट आणि फोटो शॉपमधील ‘तेजस’च्या फोटोंचे लॅमिनेशन केलेले ग्रिटींग तेजस गाडी करमाळीपर्यंत नेणाऱया तीन स्टाफमेबर्सना यावेळी भेट म्हणून देण्यात आल़े ही अनोखी भेट पाहून मुख्य चालक एस एम आखेरकर, सहाय्यक चालक निमेश कदम आणि गार्ड संतोष हुमाने या तिघांनाही सुखद आश्चर्याचा धक्का बसला. रेल्वे प्रशासनातील अनेकांना 22 मे रोजी तेजसला एक वर्ष झाले हेच माहिती नव्हत़े मात्र प्रवाशांनी केलेल्या कौतुकाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केल़ा

मध्ये रेल्वे- कोकण रेल्वे सांधा जुळेना

शुभारंभाची डबलडेकर गाडी ज्या मुख्य चालकाने चालवली होती त्यांने रोहा स्थानकाच्या पुढे आपली डयुटी नाही म्हणून डबलडेकरला दीड तास उशिर केला होता. योगायोगाची गोष्ट म्हणजे आज 22 मे रोजी तेजस चालवायला तेच मुख्य चालक होते अणि त्यांनी वाढदिवसाची तेजस एक तास उशिरा आणल़ी त्यांना सुद्धा तेजसची आज वर्षपूर्ती असल्याबाबत कोणतीच माहिती नव्हती. मंगळवारी जनशताब्दी ‘तेजस’च्या पुढे होत़ी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेचा सांधा जुळत नाही याचचे हे प्रतिक आह़े