|Friday, July 19, 2019
You are here: Home » leadingnews » तामिळनाडूत हिंसक आंदोलन , पोलिसांच्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू

तामिळनाडूत हिंसक आंदोलन , पोलिसांच्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / चेन्नई  :

तामिळनाडूतील तूतीकोरीन शहरात वेदांत ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर प्लांटविरोधात तीव्र आंदोलन सुरू असून या आंदोलनात पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला, यामध्येच आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात येत आहे.

वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर कारखान्यातून होणाऱया प्रदूषणाविरोधात हे आंदोलन आहे. कंपनीच्या विस्ताराचं वृत्त समोर आल्यापासून आंदोलन अधिकच तीव्र होत चाललं आहे. या आंदोलनाला काल अचानक हिंसक वळण लागलं आणि यामध्ये अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला.पोलिसांच्या कारवाईत अकरा जणांचा मृत्यू झाल्यामुळे राजकारण तापलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तामिळनाडूमधील राज्य सरकारवर टीका केली. पोलिसांच्या कारवाईत अकरा जणांचा मृत्यू होणं हे राज्य पुरस्कृत दहशतवादाचं उदाहरण आहे, असं ट्वीट त्यांनी केलं. तर तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते एमके स्टॅलिन यांनी राज्याच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली.