|Sunday, May 26, 2019
You are here: Home » Top News » इंधनच्या दरात दहाव्या दिवशी वाढ, देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत

इंधनच्या दरात दहाव्या दिवशी वाढ, देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कर्नाटकातील निवडणुकीनंतर सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असून त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दर आता शंभरी गाठणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशात सर्वात महाग पेट्रोल- डिझेल महाराष्ट्रात आहे. अधिक स्पष्ट करायचं झालं तर अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे.अमरावतीत पेट्रोल 86.22 रुपये तर डिझेल 73.94 रुपये आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्गात पेट्रोल 86.01 रुपये तर डिझेल 72.69 रुपये प्रति लिटर आहे.तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 85.93 रुपये तर डिझेल 73.73 रुपये आहे.मुंबईतील पेट्रोलचा दर 85 रुपये तर डिझेल 72 रुपये 66 रुपयांवर पोहोचलं आहे.

 

 

 

 

Related posts: