|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भीमेला कोक नदीतून पाणी : आ. प्रशांत परिचारक

भीमेला कोक नदीतून पाणी : आ. प्रशांत परिचारक 

उजनीतून 28 किंवा 29 मे रोजी सुटणार भीमेत पाणी

पंढरपूर / प्रतिनिधी

उजनी धरणामधून भीमेला 28 किंवा 29 मे रोजी पाणी सोडण्यात येईल. मात्र तोपर्यत अधिकमासानिमित्त पंढरीत भाविकांच्या स्नानाची होणारी गर्दी लक्षात घेता. कोक नदीतून भीमेला पाणी सोडावे. आणि वारकरी भक्तांची व्यवस्था करावी. अशा सुचना जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी अधिकाऱयांना दिल्याची माहीती आ. प्रशांत परिचारक यांनी दिली आहे. त्यामुळे भीमेत पाणी येण्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, पाटबंधारे विभागाने यंदा काढलेल्या प्रकटनामध्ये भीमा नदीला पाणी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. तथापि याबाबत मोठया प्रमाणावर सर्वत्र आंदोलने सुरू झालेली होती. अशामधेच आ. प्रशांत परिचारक यांनी नुकतीच राज्याच्या जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना भेटून भीमा नदीमधे पाणी सोडण्यांची मागणी केली. आणि सोलापूर जिल्हयातील परिस्थितीची माहीती †िदली.

सध्या उजनीमधून डाव्या आणि उजव्या कालव्याला रोटेशन नुसार पाणी सोडण्यात आलेले आहे. अशामध्येच भीमेमध्ये पाणी सोडावयाचे झाले तर किमान 7 टीएमसी तरी पाणी सोडावे लागेल. तरच सदरचे पाणी सोलापूरपर्यत पोहचू शकेल. मात्र सध्या सोलापूर महापालिकेची भीमेतून पाणी मिळण्याबाबत मागणी नाही. अशामधेच सध्या उजनीची शून्याकडे वाटचाल आहे. त्यामुळेच भीमेत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली.

   तसेच सध्या अधिक महिना सुरू आहे. पंढरपूरात दररोज किमान पन्नास हजारांहून अधिक भाविक आहेत. अशा परिस्थितीमध्ये अधिक महिन्याचे पवित्र चंद्रभागा स्नान व्हावे. ही भाविकांची इच्छा आहे. मात्र सध्या पाण्याअभावी भाविक स्नानाअभावी पोरके आहेत. त्यामुळे चंद्रभागेतील स्नानासाठी डाव्या कालवा किमी 87(मेंढरपूर-पांढरेवाडी) येथून कोक नदीतून पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना महाजन यांनी सुचना केलेल्या आहेत.

   भीमा नदीमधे उजनीमधे पाणी येणार का? हा भीषण प्रश्न होता. मात्र याबाबत जिल्हयातील आमदारांच्या प्रयत्नाने 27 मे रोजी पाणी येणार. अशी शक्यता होती. परंतु आता आ. प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नातून येत्या 28 किंवा 29 मे रोजी पाणी सुटणार असल्यांचे जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनाचीच माहीती पुढे आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये अधिक महिना लक्षात कोकनदीतून देखिल पाणी सोडण्याबाबात सुचना देण्यात आल्या. त्यामुळे या निर्णयांचे सध्या शेतकरी आणि भाविकांतून स्वागत होत आहे.

 

Related posts: