|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » संतोषकुमार यांचा आज गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश

संतोषकुमार यांचा आज गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश 

प्रतिनिधी/ पणजी

मये मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविलेले संतोषकुमार सावंत यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून आज 24 रोजी ते गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश करतील.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत संतोषकुमार सावंत यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. सावंत यांनी चांगली मते मिळवली होती. मात्र आता गोवा फॉरवर्ड पक्षाची ताकद वाढू लागल्याने सावंत हे गेल्या काही दिवसांपासून गोवा फॉरवर्डच्या संपर्कात होते. मये मतदारसंघात गोवा फॉरवर्ड आपले कार्य सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे संतोषकुमार आणि गोवा फॉरवर्डचे नेते यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती