|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कणकवली येथील तरुणाला अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कणकवली येथील तरुणाला अटक 

प्रतिनिधी/ बेळगाव

कोहळ्ळी (ता. अथणी) येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून ऐगळी पोलिसांनी कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील एका तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी ऐगळी पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

राजू परशराम शिंदे (वय 22, रा. कणकवली) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी त्याला अपहृत अल्पवयीन मुलीसह अथणीला आणण्यात आले. त्यानंतर 15 वर्षे 11 महिने वयाच्या पीडित बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार गेल्या 30 एप्रिल रोजी कोहळ्ळी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर त्या मुलीला राजूने कणकवलीला नेले होते. या संदर्भात ऐगळी पोलीस स्थानकात सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मंगळवारी कणकवलीहून पीडित मुलीसह राजूला पोलिसांनी ताब्यात घेऊन अथणीला आणले. राजू हा मूळचा कणकवली येथील राहणारा असला तरी कोहळ्ळी येथे त्याचे पाहुणे आहेत. तो वरचेवर आपल्या पाहुण्यांकडे येत होता. शेजारच्या घरातील 15 वर्षे 11 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीबरोबर त्याचे सुत जुळले. त्यानंतर त्याने तिचे अपहरण करून बलात्कार केल्याचे सांगण्यात आले. अथणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

Related posts: