|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणीत डाक सेवकांचे धरणे आंदोलन

निपाणीत डाक सेवकांचे धरणे आंदोलन 

प्रतिनिधी/ निपाणी

केंद्र सरकारने पोस्ट विभागातील डाकसेवकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देऊनही ते पूर्ण केले नाही. याविरोधात राष्ट्रीय पातळीवर डाकसेवकांनी आंदोलन पुकारले आहे. यामध्ये निपाणी भागातील डाकसेवकही सहभागी झाले आहे. येथील पोस्ट कार्यालय आवारात ग्रामीण भागातील डाकसेवकांनी मंगळवारपासून धरणो आंदोलन हाती घेतले आहे.

पोस्ट विभागात खात्यांतर्गत कर्मचाऱयांसाठी केंद्र सरकारने जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र ग्रामीण भागातील डाकसेवकांना याचा लाभ दिलेला नाही. पगार वाढीबरोबरच महिला कर्मचाऱयांना प्रसुती रजा द्याव्यात, पेन्शनचा लाभ मिळावा आदी विविध मागण्यांसाठी 16 ते 18 ऑगस्ट 2017 मध्ये राष्ट्रीय पातळीवर डाकसेवकांतर्फे आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी सदर मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र त्याचा पाठपुरावा सुरूच होता. मात्र केंद्राने सदर आश्वासन पाळले नाही.

यामुळे संतापलेल्या डाकसेवकांना राष्ट्रीय पातळीवर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामध्ये निपाणी विभागातील सुमारे 40 डाकसेवक सहभागी झाले आहेत. धरणे आंदोलनामुळे ग्रामीण भागातील स्पीडपोस्ट, रजिस्टर, मनिऑर्डर आदी सर्वच टपालसेवा ठप्प झाली आहे. यानंतर वरिष्ठ पातळीवर निर्णय होईपर्यंत निपाणी विभागात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर घट्टेकरी, उमेश पाटील, बी. एस. जाधव, पांडुरंग बटाटे, रविंद्र महाजन, दत्ता माने, व्ही. आर. जबडे, जी. पी. शिरोळे, आर. के. हंचिनमनी, एस. व्ही. केस्ती, एस. एस. होसमनी, एस. एस. मधाळे, एन. के. चौगुले यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Related posts: