|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहरातही वटवाघळांचा वावर

शहरातही वटवाघळांचा वावर 

बेळगाव / प्रतिनिधी

केरळमध्ये आढळलेल्या निपाह विषाणुंमुळे सर्वांनीच धसका घेतला आहे. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. त्यामुळे शहरातील आरोग्य विभागाच्यावतीने खबरदारी घेण्यात येत आहे. शहरातील गोवावेस व व्हॅक्सिन डेपो परिसरात वटवाघळांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने या ठिकाणी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

केरळ येथील कोझीकोडे येथे हा विषाणू आढळला असून, यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूंचा बेळगावला फारसा धोका नसला तरी खबरदारी घेण्यात येत आहे. या विषाणूंचा प्रसार वटवाघळाने खाल्लेल्या फळापासून किंवा ते फळ खाल्लेल्या पक्ष्यापासून होऊ शकतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांनाही याची बाधा होण्याची शक्मयता असते.

बेळगावला या आजाराचा धोका नसला तरी वटवाघळांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. गोवावेस येथील अग्निशमन कार्यालयाशेजारील झाडांवर हजारो वटवाघळांचा संचार आहे. तसेच व्हॅक्सिन डेपो परिसरातही वटवाघळांची संख्या मोठी असल्यामुळे खबरदारी घेणे तितकेच गरजेचे आहे.

बेळगाव शहरातील वटवाघळांची संख्या पाहता एखाद्या वेळेस हा विषाणू पसरल्यास मोठा धोका संभवण्याची शक्मयता आहे. त्यामुळे पक्ष्यांनी खाल्लेली फळे नागरिकांनी खाऊ नयेत. तसेच वटवाघळांची संख्या अधिक असणाऱया भागात संचार टाळावा.

 

लक्षणे

ताप, अंगदुखी, झोप, मानसिक गोंधळ, बेशुद्ध पडणे

खबरदारी

पक्ष्यांनी खाल्लेली अथवा जमिनीवर पडलेली फळे खाऊ नयेत  

Related posts: