|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कारखान्यांनी त्वरित ऊस बिले जमा करा

कारखान्यांनी त्वरित ऊस बिले जमा करा 

वार्ताहर/ कागवाड

ऊस बिलाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. या परिस्थितीची दखल घेऊन कागवाड तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस बिले शेतकऱयांच्या खात्यावर त्वरित जमा करावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे येथील तहसीलदारांना दिले.

निवेदनात, कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी शुगर वर्क्स कारवाड, उगार शुगर वर्क्स उगारखुर्द, अथणी शुगल लि., केंपवाड या कारखान्यांना 2017-18 या गाळप हंगामात पुरवठा करण्यात आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱयांचे पहिले बिल 15 जानेवारी 2018 पर्यंतचे शेतकऱयांच्या खात्यावर जमा केले आहे. त्यानंतरची बिले अद्याप शेतकऱयांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली नाहीत. सध्या शेतकऱयांना खरीप पेरणीपूर्व मशागती करण्याबरोबरच उसास खते, मशागतीची कामे करण्यास आर्थिक टंचाई भासत आहे. उसाचा हंगाम संपून चार महिने झाले तरी अद्याप बिले जमा न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याची दखल घेत शेतकऱयांना तातडीने बिले देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

सदर निवेदन देताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष कठारे, आयुब महात, अजित करव, प्रकाश चौगुले, अरुण जोशी, अभिजीत बिंदगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related posts: