|Monday, January 21, 2019
You are here: Home » leadingnews » तरूणीसोबात हॉटेलमध्ये गेल्याने मेजर गोगई वादाच्या भोवऱयात

तरूणीसोबात हॉटेलमध्ये गेल्याने मेजर गोगई वादाच्या भोवऱयात 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

गेल्या वषी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेवेळी एका स्थानिक तरूणाला जीपला बांधणारे मेजर लीतुल गोगोई वादाच्या भोवऱयात सापडले आहेत. एका तरूणीसोबर गोगोई हॉटेलमध्ये गेल्याने या वादाला सुरूवात झाली आहे. गोगोईंसोबत आलेल्या तरुणीला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने गोगोई यांनी हॉटेलमधील कर्मचाऱयांशी वाद घातला आणि हे प्रकरण शेवटी पोलिसांकडे पोहोचलं. या प्रकरणी मेजर गोगोई यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना परत पाठविण्यात आलं.

मेजर लितुल गोगोई यांनी श्रीनगरमधील हॉटेल ग्रँड ममतामध्ये एक रुम बुक केली होती. बुधवारी गोगोई हे हॉटेलमध्ये चेक- इन करत असताना त्यांचासोबत एक तरुणी होती. हॉटेल कर्मचाऱयांना ती तरुणी अल्पवयीन असल्याचा संशय आला. ओळखपत्र तपासले असता ती बडगामची रहिवासी असल्याचे समोर आले. हॉटेलमध्ये स्थानिक तरुणींना प्रवेश दिला जाणार नाही, असे हॉटेल कर्मचाऱयांनी गोगोई यांना सांगितले. यावरुन गोगोई आणि हॉटेल कर्मचाऱयांमध्ये वाद झाला. गोगोईंसोबत आणखी एक तरुणही होता. शेवटी हा वाद चिघळला आणि प्रकरण पोलिसांकडे गेले.

 

पोलिसांनी गोगोई, ती तरुणी आणि एका तरुणाला पोलीस ठाण्यात नेले. चौकशीनंतर त्या तिघांचीही सुटका करण्यात आली. ती तरुणी सज्ञान असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची पोलीस अधीक्षकांच्या मार्फत चौकशी सुरु आहे, असे वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी सांगितले तर सैन्यानेही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

 

 

 

 

Related posts: