|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » विधानपरिषद : सेना,भाजप प्रत्येकी 2 जागी विजयी

विधानपरिषद : सेना,भाजप प्रत्येकी 2 जागी विजयी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

स्थानिक स्वाराच्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱया विधानपरिषदेच्या सहापैकी रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली या पाच जागांचे निकाल आज जाहीर झाले आहेत.

शिवसेनेने परभणी- हिंगोली, नाशिक या दोन ठिकाणी, तर भाजपने अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीत विजय मिळवला. राष्ट्रवादीने रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग राखले. परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांचा पराभव केला. बाजोरिया यांनी 35 मतांनी विजय मिळवला. त्यांना 256 मते मिळाली. तर काँग्रेसच्या देशमुख यांना 221 मते मिळाली. अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. भाजपच्या प्रवीण पोटेंनी काँग्रेसच्या अनिल माधोगडिया यांचा पराभव केला. पोटेंना 458 मते मिळाली. तर माधोगडिया यांना केवळ 17 मते मिळाली. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतही भाजपचा विजय झाला. रामदास आंबटकर यांनी 88 मतांनी विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांना पराभूत केलं. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीच्या शिवाजी सहाणे यांना पराभूत केले. दराडे यांना 193 मते मिळाली. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. अनिकेत तटकरे यांनी तब्बल 200 मतांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळेंचा पराभव केला.