|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच राहणार :केंद्र सरकार

पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच राहणार :केंद्र सरकार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिवसोंदिवस वाढत चालेल्या पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होतील याकडे सर्वसमान्यांचे लक्ष आहे. मात्र हे दर कमी होण्याची शक्यता माळवली आहे कारण सोईसुविधांसाठी दरवाढ होतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे.

वाढत्या इंधन दरवाढीबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, दिलासा तर नाहीच पण पेट्रोल दरवाढीबाबत मोठा झटका बसला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याउलट पेट्रोलियम उत्पादनातून मिळणाऱया कराचा वापर महामार्ग आणि एम्ससारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रुग्णालयांच्या निर्मितीसाठी करण्यात येतो, अशी माहिती केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर रविशंकर प्रसाद यांना पत्रकारांनी इंधन दरवाढीबाबत प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डीझेलच्या किमती कमी होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

 

 

 

 

Related posts: