|Friday, August 17, 2018
You are here: Home » Top News » मोदींच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा : निरंजन डावखरे

मोदींच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा : निरंजन डावखरे 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत नाराज असलेले दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी निरंजन डावखरे यांनीही राष्ट्रवादीत होत असलेल्या कोंडमा-याला वाट मोकळी करून दिली. स्थानिक नेत्यांकडून काम करताना त्रास होत होता म्हणून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पवार हे मोठे नेते आहेत. तरी मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी इच्छा आहे. मुख्यमंत्री सातत्यानं माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच मी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

गेल्या 10 वर्षांपासून मी राजकारणात काम करतोय. मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वात मला आणखी चांगलं काम करता येईल, असंही निरंजन डावखरे म्हणाले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍड. निरंजन डावखरे यांनी आमदारपदाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही काल राजीनामा दिला. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे आमदार डावखरे यांनी आमदारपदाचा राजीनामा काल सुपूर्द केला होता.

 

Related posts: